बीड नगर रेल्व मार्गांत गेलेल्या शेतीचा मावज्या मिळवा
पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील डोगरकिंन्ही शिवारात सर्वे नंबर अकरा मधील शेतकरी बाबुराव विठ्ठल येवले यांची विहीर,पाईप लाईन,फळ, झाडी,असलेली जमीन रेल्वे मार्गात गेली आसुन शेतकरी बाबुराव येवले गेल्या सात आठ वर्षा पासून शासकीय कार्यालयात चकरा मारुन मारुन परिक्षान झाले असल्यामुळे अंध शेतकरी बाबुराव विठ्ठल येवले यांनी २१ नोव्हेंबर रोजी कोणत्याही क्षणी कोठेही आत्महत्या करील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.अंध शेतकरी यांनी आत्मदहनाचा इशारा देऊन देखील पाटोदा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी दखल घेतली नाही यामुळे संतप्त शेतकरी येवले यांनी अंगावर डिझेल टाकुन आत्महत्या करण्याचा एकदा प्रयत्न केला मात्र नातेवाईकाच्या सतर्कतेमुळे प्राण वाचला आसुन नातेवाईक त्यांचावर लक्ष ठेवून आहेत यामुळे प्रशासनाने या गंभीर घेटनेची तात्काळ दखल घेऊन अंध शेतकरी बाबुराव विठ्ठल येवले यांना न्याय द्यावा अशी मागणी नातेवाई प्रशासनाला केली आसुन शेतकरी बाबुराव येवले यांच्या जिवाचे बरे वाईट झाल्यास याला जबाबदार बीड नगर रेल्वे प्रशासन, अंमळनेर पोलिस व पाटोदा उपविभागीय कार्यालय रहाणार आशे नातेवाईकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगण्यात आले